Bank of India
yo You are here path  Cards path Credit Card path cardPaymentNEFTMarathi  

एनइएफटीद्वारे कार्डचे पैसे देणे

एनइएफटी पेमेंट


तुमच्या बीओआय कार्डाचे पैसे आता एनइएफटी (राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण) द्वारे भरा.

या सेवेचा लाभ घेण्याकरता तुमच्या बँकेच्या नेटबँकिंग सुविधेचा वापर करा आणि त्रयस्थ पक्ष हस्तांतरण या सदरामध्ये लाभार्थी म्हणून बँक ऑफ इंडिया कार्ड समाविष्ट करा.

एनइएफटीचे फायदे

पैसे देण्याचा सुलभ पर्याय- तुमच्या बीओआय कार्डाचे बिल ऑनलाईन भरण्याकरता एनइएफटीची सुविधा असलेले कुठलेही बँक खाते वापरा किंवा तुमच्या बँकेच्या शाखेमार्फत जा

एनइएफटीद्वारे पैसे कसे भरायचे?


अ) तुमच्या बँकेच्या नेटबँकिंग सुविधेमध्ये लॉग-इन करा आणि त्रयस्थ पक्ष हस्तांतरण या सदरामध्ये बीओआय कार्डधारकाचे नाव लाभार्थी म्हणून समाविष्ट करा.

ब) बीओआय कार्डचे पैसे देण्याकरता BKID0000101 हा आयएफएससी संकेतांक भरा.

क) बँकिंग पानावर खाते क्रमांकाच्या जागी तुमच्या बीओआय कार्डाचा 16 आकडी क्रमांक भरा.

ड) बँकेचे नाव भरा – बीओआय क्रेडिट कार्ड - एनइएफटी आणि बँकेचा पत्ता - कार्ड उत्पादने विभाग, बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, 4था मजला, 70/80 म. गांधी रोड, मुंबई 400 021.

इ) नोंदणीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पैसे भरण्याच्या या मार्गाने तुमच्या बीओआय कार्डाचे पैसे भरा.


तुमच्या बीओआय कार्डाचे देय पैसे एनइएफटीद्वारे पाठवण्याकरता तुम्ही तुमचे खाते असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये देखील जाऊ शकता व वर दिल्याप्रमाणे आयएफएससी संकेतांक, 16 आकडी बीओआय कार्ड क्रमांक, लाभार्थ्याचे नाव (वर दिल्याप्रमाणे) अशी माहिती त्याकरता देऊ शकता.

* पैसे मिळाल्याची नोंद तुमच्या बीओआय कार्ड खात्यामध्ये दिसण्याकरता 2 कामकाजाच्या दिवसांचा कालावधी लागेल.

 
Skip Navigation Links.