Bank of India
yo You are here path  Retail path Retail-Loan path BOI Star Education LoanMarathi  

स्टार शैक्षणिक कर्ज

ध्येय आणि उद्दिष्ट :

 1. स्टार शैक्षणिक कर्ज योजनेचे ध्येय बँकेकडून योग्य/गुणवंत विद्यार्थ्यांना भारतामध्ये आणि परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरता आर्थिक सहाय्य पुरवणे हे आहे. यात मुख्य भर प्रत्येक गुणवान विद्यार्थ्याला परवडण्याजोग्या अटी व शर्तींवर आर्थिक सहाय्य देऊन शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळवून देण्यावर आहे.
 1. पात्रता निकष:
  1. विद्यार्थ्याची अर्हता:
 • विद्यार्थी भारतीय नागरीक असावा;
 • त्याने उच्च माध्यमिक शिक्षण (एचएससी - 10 अधिक 2 किंवा तत्सम) पूर्ण केल्यानंतर भारतातील अथवा परदेशातील मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांमध्ये उच्चशिक्षण अभ्यासक्रमामध्ये प्रवेश परिक्षा/गुणवत्ताधारित निवडप्रक्रियेद्वारा प्रवेश मिळवलेला असावा
 • त्याची शैक्षणिक कारकीर्द चांगली असावी
 • त्याच्या नावावर अन्य कुठल्याही संस्थेच्या शैक्षणिक कर्जाची थकबाकी नसावी
 • त्याचे आई-वडील हे सहकर्जदार असावेत
 • विद्यार्थ्याच्या कायम निवासापासून सर्वात जवळ असलेली शाखा कर्जाचा विचार करेल

 

  1. पात्र अभ्यासक्रम:
   • भारतातील शिक्षण (सूचक यादी):
    • यूजीसी/शासन/एआयसीटीई/एआयबीएमएस/आयसीएमआर इ. द्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालये/विद्यापीठे यांनी चालवलेले व पदविका/पदवी मिळवून देणारे अन्य मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
    • आयसीडब्लूए, सीए, सीएफए इ. अभ्यासक्रम
    • आयआयएम, आयआयटी, आयआयएससी, एक्सएलआरआय, एनआयएफटी, एनआयडी आणि केंद्र/राज्य शासनाच्या अन्य संस्थांद्वारे चालवले जाणारे अभ्यासक्रम
    • एरोनॉटिकल, पायलट ट्रेनिंग, शिपिंग यांसारखे नियमित पदवी/पदविका अभ्यासक्रम, नर्सिंग अथवा नागरी उड्डयन/शिपिंग महासंचालक/भारतीय परिचारक परिषद यांच्याद्वारे मान्यता मिळालेल्या अन्य कुठल्याही शाखेतील पदवी/पदविका अभ्यासक्रम

 

सूचना : एआयसीटीईची मान्यता नसलेले, तसेच राज्याच्या विद्यापीठांची मान्यता नसलेल्या संस्थांतर्फे चालवले जाणारे अभ्यासक्रम प्रस्तुत योजनेच्या पात्रता कक्षेच्या बाहेर आहेत.

   • परदेशातील शिक्षण:
    • पदवी: नामांकित विद्यापीठांचे रोजगाराभिमुख व्यावसायिक/तांत्रिक अभ्यासक्रम
    • पदव्युत्तर पदवी: एमसीए, एमबीए, एमएस इ.
    • सीआयएमए-लंडन, अमेरिकेतील सीपीए इ. द्वारे चालवले जाणारे अभ्यासक्रम

 

 1. कर्जाकरता विचारात घेतले जाणारे खर्च:
  • कॉलेज/ शाळा/ होस्टेल यांची फी *
  • परीक्षा/ ग्रंथालय/ प्रयोगशाळा फी
  • पुस्तके/ साधने/ उपकरणे/ गणवेष खरेदी
  • संस्थेच्या देयके/पावत्या यांचा आधार असलेली अनामत ठेव/ इमारत निधी/ परत मिळण्याजोगी ठेव
  • परदेशातील शिक्षणाकरता प्रवासखर्च
  • अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरता आवश्यक त्या संगणकाची खरेदी
  • विद्यार्थ्याचे विमा संरक्षण
  • अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरता आवश्यक असलेले, अभ्यासदौरे, प्रकल्प, प्रबंध इ. साठीचे खर्च

   * संस्थेचे माहितीपत्रक/मागणीपत्र यांनुसार
 1. कर्जाची रक्कम:


पालक/विद्यार्थी यांची परतफेडीची क्षमता, मार्जिन आणि खालीलप्रमाणे कमाल मर्यादांच्या अधीन गरजेनुसार वित्तसहाय्य:

 • भारतातील शिक्षण - कमाल रू. 10.00 लाख
 • परदेशातील शिक्षण - कमाल रू. 20.00 लाख
 1. मार्जिन :


रू. 4 लाखांपर्यंत : काही नाही
रू. 4 लाखांपुढे - भारतातील शिक्षण : 5%
- परदेशातील शिक्षण : 15%

शिष्यवृत्ती मार्जिनमध्ये समाविष्ट केली जाऊ शकते · मार्जिन वार्षिक तत्त्वावर, कर्जवाटप होईल त्याप्रमाणे व त्यावेळी चुकते करावे लागेल.