Bank of India
yo You are here path  Corporate path Corporate-Loan path Discount FutureMarathi  

भावी नकद आवक रकमेवर बट्टयाने कर्ज

पात्रता सधन व नामवंत कॉर्पोरेट्स / नॉन कॉर्पोरेट्स / जमीनमालक, ज्‍यांचे क्रेडिट रेटिंग ‘ए’ आहे.
हेतू भाड्यापोटी मिळणा-या रकमेसहित भावी नकद आवक रकमेवर बट्टयाने कर्ज. सर्वसामान्‍य कॉर्पोरेट गरजांसाठी, जसे – खेळत्‍या भांडवलाच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी दीर्घकालीन स्रोत वाढविण्‍यासाठी आणि स्‍थावर मालमत्ता संपादन करण्‍यासाठी अथवा पुनर्वित्तासाठी / महागडी कर्जे लवकर फेडून टाकण्‍यासाठी / संघीय अर्थसहाय्य न घेता स्‍पष्‍ट मालमत्तेवर कर्ज घेण्‍यासाठी इत्‍यादी.
जास्‍तीत जास्‍त कर्ज पुढील 3-5 वर्षांतील अपेक्षित नकदी आवक / दुकोन / कार्यालय संकुले यांच्‍याकडून 10 वर्षांत येणारे भाडे.

रोख / भाड्याच्‍या अपेक्षित उत्‍पन्‍नापेक्षा 30% कमी आणि मालमत्तेच्‍या बाजारभावाच्‍या 50%.
परतफेड 3-10 वर्षे – कर्जाची जास्‍तीत जास्‍त रक्‍कम ठरविण्‍यासाठी विचारात घेतलेल्‍या रोख उत्‍पन्‍नाच्‍या मुदतीमध्‍ये कर्ज फेडावे लागेल.
 
सामान्‍य प्रक्रिया शुल्‍क लागेल.